Advertisement

मांगी-तुंगी किल्ला


महाराष्ट्र भूमीत अनेक किल्ल्यांच्या जोडगोळ्या बघायला मिळतात त्यातील हा एक किल्ला "मांगी-तुंगी".. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावाजवळ हा

किल्ला उभा आहे इथे एक जैन तीर्थक्षेत्र देखील असून तेथे चढून

जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत...

बागलाण सुपीक सधन आणि संपन्न असा मुलूख आहे बागलाण जिल्हा ही येथूनच चालू होतो हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याच्या जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात... सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगररांगेची सुरुवात होते ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते येथे असणाऱ्या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड आहेत...

बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली...

डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा, शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे..

Post a Comment

0 Comments