Advertisement

किल्ले_पावनगड

किल्ले_पावनगड  
किल्ले पन्हाळगडाचा सोबती दुर्ग किल्ले पावनगड.  
किल्ले पन्हाळा गडावर तर अनेक जण जात असतात मात्र याच पन्हाळगडाचा सोबती असलेला दुर्ग पावनगडाकडे मात्र काही मोजक्याच व जाणत्या लोकांची पावले वळतात. शिवमंदिरे , बुरुज , तोफा , विहिरी,  दर्गा अशा विविधअवशेषांनी संप्पन असा हा दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गांपैकी एक दुर्ग आहे.  पन्हाळा वेढ्याच्या वेळी पन्हाळ्याचा पूर्व बाजूस असणार्या मार्कंडेय टेकडीवरून पन्हाळ्यावर तोफांचा मारा करण्यात आला. नंतर शिवरायांनी पन्हाळा पुन्हा जिंकून घेतल्यानंतर संरक्षणातील हा महत्वाचा दोष नेमका ओळखला व शिवाजी महाराजांनी किल्ले पन्हाळागडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मार्कंडेय डोंगराचा अडथळा पाहून हा डोंगरच पन्हाळगडाचा एक घटक बनवण्यासाठी मार्कंडेय टेकडीला तटा-बुरूजांनी बंदिस्त करण्यासाठी त्याची बांधणी सुरु केली. इ.स.१६७३
 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगड या नावाने पन्हाळ्याला जोडूनच बुरुजासह हा गड बांधला.  पावनगडाच्या बांधकामाची जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल महाराजांनी अर्जोजी यादव व हिरोजी फर्जंद यांना प्रत्येकी पाच हजार होनांचे बक्षीस दिले. पावनगडावर भक्कम तटबंदी, बुरुज, तोफा , लगडबंद फकिराचा दर्गा , टी आकाराची विहीर, तुपाची विहीर, छोटी पण खोल अशी उभट विहीर, मंदिरे असे अनेक अवशेष आजही उभे आहेत. त्या काळी जखमी सैनिकांवर औषधउपचार करण्यासाठी गायीच्या जुन्या साठवणुकीतील तुपाचा वापर केला जात असे. या तुपामुळे जखमा भरून येत असत. या तुपाच्या साठवणुकीसाठी असणारी तुपाची विहीर आजदेखील आपणास पावनगडावर पाहायला मिळते या विहिरीच्या मागील बाजूसच इंग्रजी टी आकाराच्या बांधणीतील मोठी विहीर देखील गडावर आहे.

Post a Comment

0 Comments