राजे लखोजीराव जाधव

महाराष्ट्रातील म-हाटमंडळाचे मुकुटमणी म्हणजेच सिंदखेडकर समशेर बहाद्दर लखुजीराजे जाधवराव सिंदखेडकर जाधवराव म्हणजे देवगिरीच्या रामदेवरावांचे वंशज. राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्म स्थान व माहेर .लखुजीराजे यांनी सिंदखेड पारगण्याची देशमुखी मिळवली आणि ते तेथेच कायमचे स्थायिक झाले. लखुजीराजे यांच्या पत्नी म्हाळसा बाई राणीसाहेब या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. त्यांचे स्वराज्यातील योगदान अत्यंत महत्वाचे आहे. कारण त्यांनी जिजाऊ सारखी लेक घडवली होती.
     भातवडीच्या युध्यानंतर मलिक- अंबर आणि शहाजी राजे यांचे संबंध बिनसल्यामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीकडे गेले.नेमके त्याच वेळी शहाजहान दिल्लीच्या गादीवर आला.शहाजहानने निजामशाहिवर स्वारी करण्याचे ठरवले.निजामशाही नष्ट झाल्यास आपणास घातक ठरेल या विचाराने सर्व मराठे एकत्र येऊन निजामशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले.मोगलांकडे असणार्या लखुजीराजे जाधवराव यांनाही निजामशाहीत आणले. लखुजीराजे व शहाजी राजे एक दिलाने लढून निजामशाहीला विजय मिळवून देत होते. हे दोन सरदार एकत्रित राहिले तर आपले वर्चस्व कमी होईल अशी भिती मलिक अंबर याला नेहमीच वाटत होती.म्हणून खंडागळे हत्ती प्रकरणात लखुजीराजे जाधवराव यांना दोषी ठरवून त्यांना निजामशाही सोडण्यासाठी भाग पाडले. लखुजीराजे यांचा वाढता दबदबा पाहून मलिक अंबर त्यांना नेहमीच विरोध करत  . त्यावरून स्पष्ट होतेकी लखोजीराजे जाधवराव यांचा दबदबा खुप वाढत होता. त्यात २४००० हजार शिपाई आणि १५००० घोड़दळ तसेच ५२ चावड्याचे वतन त्यांच्याकडे होते. १६२९ साली राजेलखोजीराव जाधव हे सिंदखेडला आले तेंव्हा हि बातमी निजामशहास कळाली. हा सरदार आपण हातचा सोडला. तो अत्यंत कावेबाज होता त्याचा दरारा मोठा होता तसेच स्वामिनिष्ठ होता परंतु स्वखुशीने तो आता आपल्याकडे येणे शक्य नाही. मोगल निजामशाहीच्या गादीला केंव्हा धोका पोहचवतील याचा नेम नाही. राजे लखोजीराव जाधव यांच्याशी युद्ध करणे जय मिळवणे याची आशा नाही हा विचार करत लखोजीराजे यांना कपटाने मारावे हा निर्णय निजामशहाने घेतला. राजेलखोजीराव जाधव यांना निजामशहाने मुलाबाळासह दौलताबाद येथे बोलावले. लखोजीराजे जाधव आपल्या मुलांसह दरबारात आले असता चौघेही जाधवराव मोठ्या अदबीने सुलतानाच्या पुढे जाऊन ऊभे राहिले.मुजरे घातले.परंतु सुलतान एकदम दरबारातून ऊठून आत गेला लखुजी जाधवरावांच्या सारख्या तोलामोलाच्या सरदारांचा मुद्दाम ठरवून अपमान केला गेला. विश्वासघाताने दगाबाजी करून निजामशहाने राजेलखोजीराव जाधव त्यांची दोन मुले अचलोजीराजे व राघोजीराजे आणि नातू यशवंतराव या चौघांची २५ जुलै १६२९ रोजी कपटाने हत्या करण्यात आली .एका शौर्यशाली, पराक्रमी, खानदानी घराण्याचा अंत झाला.

🙏राजे लखोजीराव जाधव यांच्या स्मृतीस विनम्रअभिवादन आणि पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा त्रिवार मुजरा..🙏
- डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर, पुणे
चित्रकार :- Pramod Kallappa Morti दादा 🙏

Comments

Popular posts from this blog

Shivneri Fort

Visit To The Harishchandra Gad.

Goa Dream of Every Friends Group & Every Traveler.