कुर्डुगड (विश्रामगड)


⛰️⛳ कुर्डुगड(विश्रामगड) ⛰️⛳
या माणगाव तालुक्यामधे एका अनगड ठिकाणी कुर्डुगडाचा किल्ला दबा धरुन बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुर्डुगड मोसे खोर्‍यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजीराजांचे समकालीन आणि सहकारी होते. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला *विश्रामगड* असेही म्हणतात.

सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डुगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणार्‍या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कुर्डुपेठ नावाची
सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. 
कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत. भिर्‍याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते.
 प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. ताम्हणी घाटाचे रक्षण करण्यासाठी *कुर्डुगड* ( *विश्रामगड* ) हा किल्ला बांधण्यात आला होता.
 *कुर्डुगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत.* त्यातील प्रचलित मार्ग म्हणजे माणगाव कडून एस.टी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे लागते

Comments

Popular posts from this blog

Shivneri Fort

Visit To The Harishchandra Gad.

Goa Dream of Every Friends Group & Every Traveler.